Atma Malik Educational & Sports Complex · Vishwatmak Jangli Maharaj Ashram Trust
Atma Malik Prathamik Gurukulआत्मा मालिक प्राथमिक गुरुकुल · कोकमठाणAtma Malik Educational & Sports Complex, Kokamthan, near Shirdi
कॅम्पसकोकमठाण, शिर्डीजवळदिशा पहा →
कार्यालयीन वेळसोम–शनि · सकाळी १० ते ७रविवार · सकाळी १० ते ५
आत्मा मालिक प्राथमिक गुरुकुल, कोकमठाण
प्रवेश सुरू · २०२७–२८

आत्मा मालिक प्राथमिक गुरुकुल

कोकमठाण, शिर्डी येथील निवासी प्राथमिक गुरुकुल – आनंददायी, शिस्तबद्ध आणि भयमुक्त वातावरणात शिक्षण.

प्रवेश चौकशीगुरुकुलाविषयी
प्रवेश स्पर्धा परीक्षा फी / My Account वसतिगृह फोटो गॅलरी संपर्क
शाळेचा परिचय

आत्मा मालिक गुरुकुल, कोकमठाण मध्ये आपले स्वागत आहे

आजचे युग हे विज्ञानाचे, स्पर्धेचे व धावपळीचे आहे. एकत्र कुटुंबपद्धती कमी होत असल्याने आणि घरातील प्रत्येक प्रौढ व्यक्ती अर्थार्जनात व्यस्त असल्याने पालकांना मुलांसाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. अशा वेळी शाळा हेच मुलांचे “शिक्षणाचे घर” बनते.

आमच्या गुरुकुलात शैक्षणिक विषयांइतकेच महत्त्व खेळालाही दिले जाते. शाळेत संगणक कक्ष, ग्रंथालय, संगीत दालन आणि कलादालन आहे. दूरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह आहे. दरवर्षी वार्षिक उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जातात.

निवासी प्राथमिक गुरुकुल
इयत्ता २ री पासून स्पर्धा परीक्षा तयारी वर्ग
संगणक कक्ष व ग्रंथालय
वसतिगृह, भोजनालय, जलतरण, जिम
योगसाधना व ध्यानधारणा
सुशिक्षित व सक्षम शिक्षक
अधिक वाचा
आत्मा मालिक प्राथमिक गुरुकुल
मुख्याध्यापक मनोगत

मुलांचा सर्वांगीण विकास

शालेय शिक्षणाचा प्रारंभ हा मुलाच्या विकासाच्या मार्गावरचा महत्त्वाचा टप्पा असतो. शाळेत येताना हवीहवीशी वाटणारी शाळा, शिक्षक व वर्गातील सवंगडी आणि दैनंदिन कामकाजातील प्रसन्नता हे विद्यार्थ्यांच्या यशाचे गमक आहे. मुलाला सुसंस्कारित करणे आणि त्यातून उद्याचा सुजाण नागरिक घडविणे यात शाळेची महत्त्वाची भूमिका आहे.

पूर्ण मनोगत वाचा
मुख्याध्यापक
शैक्षणिक उपलब्धी

सन्मान शाळेचा

पुरस्कार२००६ – हागणदारीमुक्त पुरस्कार. २०११–१२ – कर्मवीर भाऊराव पाटील शालेय स्वच्छता पुरस्कार.
स्पर्धा परीक्षांतील यशइयत्ता २ री पासून शालेय वेळेव्यतिरिक्त तयारी वर्ग; २००७ साली कोपरगाव तालुक्यात प्रथम क्रमांक.
चित्रकला स्पर्धा २०१३“तारे जमीन पर” राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत गुरुकुलातील ९१ विद्यार्थ्यांचा सहभाग व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
शाळेच्या सुविधा

गुरुकुलातील क्षणचित्रे

फोटो गॅलरी पहा
प्रवेश चौकशी २०२७–२८

प्राथमिक गुरुकुल – प्रवेश हेल्पलाईन

सोम–शनि १० ते ७ · रविवार १० ते ५
प्रवेश विभाग+91 86696 00700
+91 86696 00900
कार्यालय+91 75886 94082
+91 98900 47682