Atma Malik Educational & Sports Complex · Vishwatmak Jangli Maharaj Ashram Trust
Atma Malik Prathamik Gurukulआत्मा मालिक प्राथमिक गुरुकुल · कोकमठाणAtma Malik Educational & Sports Complex, Kokamthan, near Shirdi
कॅम्पसकोकमठाण, शिर्डीजवळदिशा पहा →
कार्यालयीन वेळसोम–शनि · सकाळी १० ते ७रविवार · सकाळी १० ते ५

स्पर्धा परीक्षा

मंथन प्रज्ञाशोध परीक्षा आणि गुरुकुलाची शैक्षणिक उपलब्धी.

Competitive exams · स्पर्धा परीक्षा

मंथन प्रज्ञाशोध परीक्षा

आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. जगात सर्वत्र स्पर्धा सुरू आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी टिकून राहावा अशी प्रामाणिक इच्छा असेल तर त्याचा पाया भक्कम असला पाहिजे. या भक्कम पायाभरणीसाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

प्रत्येक क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी क्षमता चाचणी द्यावी लागते. त्या क्षमता चाचणीचे स्वरूप लक्षात घेता प्राथमिक स्तरावर प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती यांसारख्या स्पर्धा परीक्षा हा शालेय विद्यार्थी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

विद्यार्थ्यांची क्षमता आणि कल्पनाशक्ती अमर्याद आहे. या चिमुकल्यांच्या क्षमतेला व कल्पनेला योग्य मार्गदर्शन करणे, नवी जिद्द आणि नवी उमेद निर्माण करणे, चिकाटी व सातत्य निर्माण करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे – हेच आमचे ध्येय आहे.

गुरुकुलातील विद्यार्थी
Achievements · शैक्षणिक उपलब्धी

सन्मान शाळेचा

शाळेला मिळालेले पुरस्कारशाळेला आतापर्यंत विविध क्षेत्रांतील कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. २००६ साली हागणदारीमुक्त पुरस्कार आणि २०११–१२ या वर्षी कर्मवीर भाऊराव पाटील शालेय स्वच्छता पुरस्कार मिळाला आहे.
स्पर्धा परीक्षांतील यशइयत्ता २ री च्या वर्गापासून स्पर्धा परीक्षांचे तयारी वर्ग शालेय वेळेव्यतिरिक्त चालवले जातात. त्याचेच फलित म्हणजे अनेक विद्यार्थी परीक्षेत यश मिळवत आहेत. २००७ साली कोपरगाव तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
शाळाबाह्य स्पर्धांमधील यशविद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून चित्रकला, समूहनृत्य, गायन, विज्ञान प्रदर्शन अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते.
चित्रकला स्पर्धा २०१३“तारे जमीन पर” या राज्यस्तरीय शालेय चित्रकला स्पर्धेत गुरुकुलातील ९१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.