आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल
प. पू. सद्गुरू गुरुदेव माउलींच्या कृपाछत्राखाली सन १९९५ साली गुरुकुलाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आधुनिक शिक्षणाला अध्यात्माची जोड देऊन एक सुसंस्कारित पिढी घडविण्याचे कार्य गुरुकुलामध्ये सुरू आहे.
६४ विद्यार्थ्यांसह सुरू झालेले हे माध्यमिक गुरुकुल आज २३०० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे. आम्ही जरी मराठी माध्यमाचे गुरुकुल चालवत असलो तरी केवळ शिकण्याचे माध्यम वगळता इतर सर्व गोष्टी इंग्रजी माध्यम किंवा सी.बी.एस.ई. च्या धर्तीवर आहेत.
आज आम्ही कला, क्रीडा, संगीत, नृत्य, अभिनय, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा अशा सर्व क्षेत्रांत जिल्ह्यामध्ये अग्रणी आहोत याचा सार्थ अभिमान वाटतो. गुरुकुलातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.












