Atma Malik Educational & Sports Complex · Vishwatmak Jangli Maharaj Ashram Trust
Atma Malik Prathamik Gurukulआत्मा मालिक प्राथमिक गुरुकुल · कोकमठाणAtma Malik Educational & Sports Complex, Kokamthan, near Shirdi
कॅम्पसकोकमठाण, शिर्डीजवळदिशा पहा →
कार्यालयीन वेळसोम–शनि · सकाळी १० ते ७रविवार · सकाळी १० ते ५

शिक्षक

मुख्याध्यापक मनोगत, आमचे शिक्षक आणि शाळेतील कार्यरत विभाग.

Principal's message · मुख्याध्यापक मनोगत

मुख्याध्यापक मनोगत

मुलांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी आनंददायी, शिस्तबद्ध आणि भयमुक्त अशा वातावरणात दिलेले ज्ञान म्हणजे शिक्षण. बालमनावर या गोष्टीचा निश्चितच परिणाम जाणवतो. शाळेमध्ये येत असताना त्यास हवीहवीशी वाटणारी शाळा, शिक्षक व त्यांचे सवंगडी अर्थात वर्गातील विद्यार्थी, दैनंदिन कामकाज करतेवेळी असणारी प्रसन्नता हे विद्यार्थी यशाचे गमक आहे.

मुलाला सुसंस्कारित करणे आणि त्यातून उद्याचा सुजाण नागरिक घडविणे यात शाळेची महत्त्वाची भूमिका आहे. मुलांच्या जडणघडणीच्या या प्रवासात मुलाला लागेल तिथे मदतीचा हात देणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सजग राहणे, यात सर्वांचाच मोलाचा वाटा असावा असे मला वाटते.

विद्यार्थी–पालक–शिक्षक या त्रिकोणाकडे पाहिल्यावर प्रथम प्राधान्य निश्चितच विद्यार्थ्यास देणे आवश्यक वाटते. प्रत्येक मूल हे स्वतंत्र विचाराचे असते. त्याने काय व्हावे यापेक्षा त्याला काय करावयाचे आहे, आणि त्याच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांचा विकास करणे हे ध्येय पालक व शिक्षकांनी अगोदर विचारात घेणे आवश्यक आहे.

“निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय याच्या बळावर भारतीय संस्कृती उभारण्यात आली आहे,” असे साने गुरुजींच्या लेखात आढळते. गुरुकुल पद्धतीने शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना ध्यानधारणा, योगसाधना, अध्यात्मज्ञान, गुरुनिष्ठा आणि “आत्मा हाच परमेश्वर” समजून वागणारी पिढी तयार झाली तर एक सुजाण नागरिक तयार होईल. हाच मानस घेऊन आम्ही पुढील वाटचाल करीत आहोत.

मुख्याध्यापक, आत्मा मालिक प्राथमिक गुरुकुल
Our teachers · आमचे शिक्षक

शिक्षक

Departments · विभाग

शाळेतील कार्यरत विभाग

अ.नं.विभागाचे नावविभाग प्रमुख
१आस्थापन विभागश्री. गायकवाड सर
२शालेय अंतर्गत विभागश्री. पवार सर
३परीक्षा विभागश्री. पवार सर
४सांस्कृतिक व छायाचित्रण विभागश्रीमती. सानप मॅडम
५कब बुलबुलश्रीमती. मुठे मॅडम
६विशेष तयारी वर्ग विभागश्रीमती. ढेपले मॅडम
७स्पर्धा परीक्षा विभागश्री. बोर्ड सर
८शा. पो. आहार व संगणकश्री. बोर्ड सर
९विद्यार्थी ये-जाश्रीमती. मुठे मॅडम
१०क्रीडा विभागश्री. भदारगे सर
११आरोग्य विभागश्री. कदम सर
१२परिपाठ विभागश्री. भदारगे सर
१३कला संगीत विभागश्री. सूर्यवंशी सर
१४फलक लेखन विभागश्री. खंबाईत सर
१५सहल व क्षेत्रभेट विभागश्री. पवार सर
१६ग्रंथालयश्रीमती. रेडडी मॅडम
१७प्रसिद्धी विभागश्री. खंबाईत सर
१८इंग्रजी विभागश्रीमती. खांडरे मॅडम
१९शालेय स्पर्धा विभागश्रीमती. खांडरे मॅडम
२०माता पालकश्रीमती. सानप मॅडम
२१शिक्षक पालकश्रीमती. रेडडी मॅडम
२२महिला तक्रार निवारणश्रीमती. रेडडी मॅडम
२३परिवहन विभागश्री. भदारगे सर
२४विद्यार्थी तक्रार निवारणश्री. बोर्ड सर
२५शालेय व्यवस्थापनश्री. पवार सर
२६भोजनालय विभागश्री. पवार सर