आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाविषयी ( महिती )

प. पू. सद्गुरू ! गुरुदेव माउलींच्या कृपाछत्राखाली सन १९९५ साली गुरुकुलाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आधुनिक शिक्षणाला अध्यात्माची जोड देऊन एक सुसंस्कारित पिढी घडविण्याचे कार्य गुरुकुलामध्ये सुरु आहे. बघता बघता छोट्य रोपाचे रुपांतर आज एका विशाल वटवृक्षामध ्ये झाले. या वटवृक्षाच्या छत्रछायेमध्ये आजपर्यंत अनेक पक्षी येऊन विसावले व येथूनच जीवनासाठीची संजीवनी घेऊन मार्गस्त झाले. गुरुदेवांच्या कृपाछत्रेखाली व व्यवस्थापन मंडळाच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुल यशस्वीपणे गरुडझेप घेत आहे. ६४ विद्यार्थ्यासह सुरु झालेले हे माध्यमिक गुरुकुल आज २३०० विद्यार्थापर्यंत पोहचले आहे. आज सर्व ठिकाणी मराठी माध्यमासाठी विद्यार्थी संख्या टिकविणे अवघड होत असताना आपला विद्यार्थी आलेख मात्र वाढतो आहे. आम्ही जरी मराठी माध्यमाचे गुरुकुल चालवत असलो तरी केवळ शिकण्याचे माध्याम वगळता इतर सर्व गोष्टी ह्या इंग्रजी मध्यम किवा सी.बी.एस.ई. च्या धर्तीवर आहे. सर्व प्रकारच्या गुणवत्ता व सुविधा या साठी आमची स्पर्धा हि मराठी माध्यमाच्या शाळेबरोबर नसून ती इंग्रजी माध्यम व सी.बी.एस.ई. च्या शाळेबरोबरच आहे. मराठी व सेमी इंग्रजीज माध्य्माची अद्यावत सर्व ध्य्माची अद्यावत सर्व सोयीनी परिपूर्ण व गुणवत्तेमध्ये अव्वल स्थान राखणारे गुरुकुल निर्माण करून मराठी व सेमी इंग्रजी मध्यमाच्या विध्यार्थानाही सर्व संधी निर्माण करून देणे हे गुरुकुलाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. आज आम्ही कला, क्रीडा, संगीत नृत्य, अभिनय स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, सर्व परिक्षा या सर्व क्षेत्रात जिल्ह्यामध्ये अग्रणी आहोत याचा सार्थ अभिमान वाटतो. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे तरच पुढील उच्च शिक्षणामध्ये व जीवनामध्येही मुले यशस्वी होतात हे अनेक शिक्षणतज्ञ व मानसशास्त्राज्ञांचे मत आहे व त्याचा अनुभव आम्हाला सातत्याने येतो. आज मराठी व सेमी इंग्रजी माध्यामामध्ये शिकलेले आमचे विध्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये यशशिखरे सर करत आहेत. या वाटचालीमध्ये आम्हाला पालकांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभते आहे. त्या शिवाय असे चौफेर यश मिळवणे अशक्य आहे. आधुनिक शिक्षणाबरोबरच प्रत्येकाला आपल्यामध्ये असलेल्या आत्म्स्वरुपाची ओळख होने म्हणजेच खरे शिक्षण आहे. सर्व देवाचा देव म्हणजे आत्मा हा प्रत्येकाच्या हृदयात स्थिर असतो व तो ध्यानाने प्राप्त होतो. गुरुकुलातील विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आत्म्यावर प्रेम करण्याची कला म्हणजे ध्यान व ज्याला ती साध्य झाली त्याला सदैव आत्म्याची साथ प्राप्त होते. सर्व देवांनी ज्याचे ध्यान केले तो आत्मा व त्याला जाणून घेणे जर बालवयातच शक्य झाले तर जीवनाचे सार्थक झाले आणि अशा आत्म्याला जाणून घेण्याचे काम विध्यार्थी गुरुकुलामध्ये राहून सातत्याने करतात व आपले आयुष्य सुखी व समाधानी बनवतात.

आपणांस ग्वाही देऊ इच्छीतो की, आपल्या पाल्यास गुरुकुलामध्ये शिकविण्याचा आपण घेतलेला निर्णय हा नक्कीच योग्य आहे व त्याचे दूरगामी फायदे आपणांस निश्चीत प्राप्त होतील.

प्रवेश चौकशी 2022-23

गुरुकुलाची यशो गाथा

1
 • नवाहर नवोदय प्रवेश परीक्षा.
 • पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा.
 • राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विदयार्थी शिष्यवृत्ती परीक्षा (N.M.M.S. इयत्ता ८ वी)
पुढे वाचा
2
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (N.T.S-पला १० वी)
पुढे वाचा
3
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा
पुढे वाचा

20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव

2105

आनंदी विद्यार्थी

71

एकूण कर्मचारी

33

कॅम्पस एकर

27

शिक्षक

उपक्रम

सुविधा व वैशिष्ट्ये

 • आंतरराष्ट्रीय वनचि मराठी सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणारे गुरुकुल.
 • [[इ. ८ वी पासून IIT NEET, JEE व च्या NDA फाऊंडेशन कोर्सची सुविधा.
 • व्यवहारीक शिक्षणाबरोबर आध्यत्मिक संस्कार देणारे गुरुकुल.
 • विद्यार्थ्यांच्या सर्वागिण कलागुणांना वाव देणारे गुरुकुल.
 • सर्व प्रकारच्या शालेय शासकिय व खाजगी स्पर्धा परीक्षांच्या.
 • निकालामध्ये महाराष्ट्रात अग्रेसर असणारे गुरुकुल.
 • विद्यार्थ्याच्या सर्वांगीन गुणवत्ता साधासाठी शिवध उपक्रम राबविणारे गुरुकुल.
 • आद्यवतअटल टिंकरिंग लॅब आधुनिक विज्ञान प्रयोग परीपूर्ण संगणक लॅब .
 • सर्व क्लास डिजीटल युक्त (SMART CLASSES).
 • सुसज्ज ग्रंथालय
 • सर्व प्रकारच्या खेळासाठी सुसन मैदान
 • सर्व सोयींनी युक्त संगीत कक्ष्, कलादालन
 • एन.सी.सी.मलिटरी शिवन

सुसज्ज वसतिगृह

 • मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह.
 • प्रत्येक वसतिगृहासाठी स्वतंत्र व्यवस्थापक.
 • अधिक्षक, हाऊस मास्टर व मदतनिस
 • सुसज्ज वैद्यकिय व्यवस्था
 • शुध्द सात्विक शाकाहारी भोजन.
 • पिण्यासाठी आर. ओ. पाणी, अत्याधुनिक लाँड्री.
 • गरम पाण्याची व्यवस्था.
 • २४x७ लाईट व पाण्याची व्यवस्था.
 • अत्याधुनिक बहुउद्देशीय समागृह व ध्यान कक्ष
 • स्वतंत्र अभ्यासिकेची व्यवस्था.

गुरुकुलास मिळविलेले विविध पुरस्कार

वर्ल्ड वाइड आर्कीव्हर्स वर्ल्ड एज्युकेशन सादर आणि पुरस्कार 2018 महाराष्ट्रातील उत्कृष्ट क्रीडा अभ्यासक्रम असलेली सर्वात आशादायक शाळा

ISO-9001:2015 मानांकन प्राप्त

भारतीय प्रतिभा परीक्षा, मुंबई राष्ट्रीय सुवर्ण विद्यालय पुरस्कार

नोस फाऊंडेशन नाशिकला राष्ट्रीय उत्कृष्ट शाळेचा पुरस्कार

गांधी रिसर्च फाउंडेशन उत्कृष्ट शाळा पुरस्कार

संजीवनी महोत्सव 2018-19 च्या सर्वसाधारण विजेतेपद

अखिल भारतीय राष्ट्रभाषा विकास समिती आदर्श पाठशाळा पुरस्कार

कलाभारती सक्रिय शाळा पुरस्कार

विज्ञान ऑलिम्पियाड उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र

क्षितिजा प्रकाशन आदर्श शाळा पुरस्कार

जनसेवा फाउंडेशन विज्ञान उपक्रमशील शाळा

मिलिंद संस्था राजश्री छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार


Contact Us


Address

Vishwatmak Jangli Maharaj Ashram Trust, At. Post. Kokamthan, Shirdi-Kopargaon Road, Tal: Kopargaon, Dist: Ahemadnagar(MH) Pin-423601

FOR CBSE BOARD

+91 7030337337
+91 9890047682

FOR JOUNIOR COLLEGE

+91 8669600700
+91 8669600900

FOR NDA ACADEMY

+91 7721994411
+91 7743996677

FOR MARATHI AND SEMI ENGLISH MEDIUM

+91 7588694079
+91 9922424796
+91 7588694081

FOR ENGLISH MEDIUM STATE BOARD

+91 7588694080
+91 9921813275

Please Visit

atmamalikeducation.in

amnda.in

atmamalikjrcollege.in

Working Hours

Mon-Sat: 10AM to 7PM
Sunday: 10AM to 5PM