सह-अभ्यासक्रम आणि अभ्यासेतर क्रियाकलापांमध्ये भरपूर एक्स्पोजर देऊन विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकसित करणे.
ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी उच्च शैक्षणिक मार्ग प्रदान करणे.
सह-अभ्यासक्रम आणि अभ्यासेतर क्रियाकलापांमध्ये भरपूर एक्स्पोजर देऊन विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकसित करणे.
नैतिक मूल्ये आणि निष्पक्ष स्पर्धेची भावना जोपासणे, जे विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार बनवते.
विद्यार्थी व पालकांशी संवाद:
"माझ्या मुलाने यशाची उत्तुंग शिखरे पार करावी त्याचबरोबर, तो अज्ञाधारक, कष्टाळू व सर्वगुणसंपन्न असावा" अशी प्रत्येक पालकांची अपेक्षा असते. विद्यार्थांवरील संस्कार हे खालील बाबींवर अवलंबून असतात.
विद्यार्थ्यांचे आई-वडील.
विध्यार्थी ज्या ठिकाणी राहातो व वाढतो तो परिसर/समाज
शाळा
मित्र/संगत
या चारही बाबींचा परिणाम हा विध्यार्थाचे व्यक्तिमत्व घडविण्यास कारणीभूत ठरते.
वरील चारही बाबी अनुकूल असल्या तरी विद्यार्थ्यास उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी आणखी दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.
वरील घटक अनुकूल झाले तर आयुष्यातील कितीही मोठे ध्येय विद्यार्थी गाठू शकतो. दुर्देवाने आजच्या धावपळीच्या जीवनात आई-वडील दोघेही वैयक्तिक अडचणीमुळे पूर्ण क्षमतेने लक्ष देवू शकत नाही.
अनेक खाजगी शाळा उपलब्ध आहेत परंतु संस्कारानेयुक्त शाळा अभावानेच व बोटावर मोजण्याइतक्याच आहेत.विद्यार्थी ज्या मित्रमंडळींच्या व समाजाच्या संगतीत वाढतो आहे. ज्या ठिकाणी व्यसनाधीनता व चंगळवाद आहे व विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय दिसत आहे.
पालकांच्या मनस्थितीचा व एकूणच परिस्तितीमध्ये आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी सर्व सुविधायुक्त शाळा निर्माण करण्याचा प्रयत्न विश्वात्मत ओम गुरुदेवांच्या प्रेरणेने आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या रूपाने आम्ही संघटीतपणे करीत आहोत.
"आत्मसंयम,उदात्त,प्रेम,परोपकार,सेवा शिस्त,सर्वशक्तिमान,दया,आनंदस्वरूप,कल्याणकारी " हे सर्व गुण हे पूर्ण रूपाने प्रकट झालेल्या "आत्म्याचे"म्हणजेच परमेश्वराचे आहेत. विद्यार्थ्यांमधील दडलेले हे गुण पूर्ण रूपाने प्रकट करण्यासाठी मूलतः या शैक्षणिक संकुलाची स्थापना झाली आहे.एकवेळ विद्यार्थ्यांमधील असणाऱ्या सर्वशक्तिमान आत्म्याचे गुण प्रकट झाले तर आई-वडिलांना, शिक्षकांना, समाजाला, देशाला,विश्वाला अपेक्षित परिणाम हि मुले देऊ शकतील व आपले इच्छित ध्येय साध्य करू शकतील.
विद्यार्थ्यामधील गुणांचे व शक्तीचे प्रकटीकरण करणे फक्त बोलून व लिहून साध्य होणार नाही त्यासाठी संघटीतपणे मुलांवर कष्ट करावे लागतील .मुलांना उच्च ध्येय प्राप्तीसाठी प्रेरित करावे लागेल व अशा उच्च ध्येय बाळगणाऱ्या मित्रांची सांगत घ्यावी लागेल व ध्येय प्राप्तीसाठी झटण्याऱ्या शिक्षकांचे सहाय्य घ्यावे लागेल.सद्गुरु सांगतात "आत्म्याचे स्वतःमधील प्रकटीकरण हे ध्यानाच्या माध्यमातून होईल व हेच ध्यान विद्यार्थी,शिक्षक यांनी संग संगतीत केले पाहिजे."
सद्गुरूंची समाजावर अनंत कृपा आहे कि पालकांची,विद्यार्थ्यांची,समाजाची इच्छा पूर्ण करण्याची व विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनविण्यासाठी शैक्षणिक संकुलाची स्थापना केली.
आपण पालक भाग्यवान आहात. समाजातील विकृतीपासून दूर आपल्या पाल्य अध्यात्मिक वातावरणात शिक्षण घेत आहे. आपण सर्वजण प्रार्थना करूया की ध्यानाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी आत्म्याचे प्रकटीकरण स्वतःच्या ठिकाणी करून जीवनातील उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी सर्वशक्तिमान बनेल. अशी शक्ती सद्गुरु प्रधान ठिकाणी करून जीवनातील उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी सर्वशक्तिमान बनेल. अशी शक्ती सद्गुरु प्रदान करतील.
प.पु.सद्गुरू आत्मा माऊलींच्या कृपाछत्राखाली सन १९९५ साली गुरुकुलाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आधुनिक शिक्षणाला अध्यात्माची जोड देवून एक सुसंस्कारित पिढी घडविण्याचे कार्य गुरुकुलामध्ये मध्ये सुरु आहे. बघता बघता छोट्याशा रोपाचे रुपांतर आज एका विशाल वटवृक्षामध्ये झाले आहे. या वटवृक्षाच्या छत्रछायेमध्ये आजपर्यंत अनेक पक्षी येऊन विसावले व येथूनच जीवनासाठीची संजीवनी घेऊन मार्गस्थ झाले.
गुरुदेवांच्या कृपाछत्राखाली व व्यवस्थापन मंडळाच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुल यशस्वीपणे गरुडझेप घेत आहे. ६४ विद्यार्थ्यासह सुरू झालेले हे माध्यमिक गुरुकुल आज २३०० विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले आहे. आज सर्व ठिकाणी मराठी माध्यमासाठी विद्यार्थी संख्या टिकविणे अवघड होत असताना आपला विद्यार्थी संख्येचा आलेख मात्र वाढतो आहे.
आम्ही जरी मराठी माध्यमाचे गुरुकुल चालवत असलो तरी केवळ शिक्षणाचे माध्यम वगळता इतर सर्व गोष्टी ह्या इंग्रजी माध्यम किंवा सी. बी. एस. सी. च्या धर्तीवरती आहे. सर्व प्रकारच्या गुणवत्ता व सुविधा यासाठी आमची स्पर्धा ही मराठी माध्यमाच्या शाळेबरोबर नसून ती इंग्रजी माध्यम व सी.बी.एस.सी च्या शाळेबरोबरच आहे.
मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाची अद्यावत सर्व सोयींनी परिपूर्ण व गुणवत्तेमध्ये अव्वल स्थान राखणारे गुरुकुल निर्माण करून मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनाही सर्व संधी निर्माण करून देणे हे गुरुकुलाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे
आज आम्ही कला, क्रीडा, संगीत नृत्य, अभिनय स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, सर्व परीक्षा या सर्व क्षेत्रात जिल्ह्यामध्ये अग्रणी आहोत याचा सार्थ अभिमान वाटतो.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे आपले मातृभाषेतूनच झाले पाहिजे तरच पुढील उच्च शिक्षणामध्ये व जीवनामध्ये ही मुले यशस्वी होतात हे अनेक शिक्षणतज्ञ व मानसशास्त्रज्ञानाचे मत आहे व त्यांचा अनुभव आम्हासही सातत्याने येतो. आज मराठी व सेमी इंग्रजी माध्यमामध्ये शिकलेले आमचे विद्यार्थी अनेक क्षेत्रांमध्ये यश शिखरे सर करत आहेत. या वाटचालीमध्ये आम्हाला पालकांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभते आहे. त्याशिवाय असे चौफेर यश मिळवणे अशक्य आहे.
आधुनिक शिक्षणाबरोबरच प्रत्येकाला आपल्यामध्ये असलेल्या आत्मस्वरूपाची ओळख होणे म्हणजेच खरे शिक्षण आहे. सर्व देवांचा देव म्हणजे आत्मा हा प्रत्येकाच्या हृदयात स्थिर असतो व तो ध्यानाने प्राप्त होतो.
आत्मावर प्रेम करण्याची कला म्हणजे ध्यान व ज्याला ही जी साध्य झाली त्याला सदैव आत्म्याची साथ प्राप्त होते. सर्व देवांनी ज्याचे ध्यान केले तो आत्मा व त्याला जाणून घेणे जर बालवयातच शक्य झाले तर जीवनाचे सार्थक झाले आणि अशा आत्म्याला जाणून घेण्याचे काम विद्यार्थी गुरुकुलामध्ये राहून सातत्याने करतात व आपले आयुष्य सुखी समाधानी बनवितात.
गुरुकुलातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कटिबंध आहोत. आपणास आम्ही गवाही देऊ इच्छितो की, आपल्या पाल्यास गुरुकुलमध्ये शिकविण्याचा आपण घेतलेला निर्णय हा नक्कीच योग्य आहे व त्याचे दूरगामी फायदे आपणास निश्चितच प्राप्त होतील.
Vishwatmak Jangli Maharaj Ashram Trust, At. Post. Kokamthan, Shirdi-Kopargaon Road, Tal: Kopargaon, Dist: Ahemadnagar(MH) Pin-423601
+91 7030337337
+91 7588694078
+91 8669600700
+91 8669600900
+91 7588694079
+91 9922424796
+91 7588694081
+91 7721994411
+91 7743996677
+91 7588694080
+91 9921813275
atmamalikeducation.in
amnda.in
atmamalikjrcollege.in
Mon-Sat: 10AM to 7PM
Sunday: 10AM to 5PM